Hot Posts

6/recent/ticker-posts

ही गाडी लवकरच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे .

 ही गाडी लवकरच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे .




 TATA SIERRA : नमस्कार मित्रांनो आज एका नवीन गाडीची माहिती मी या ब्लॉगमध्ये घेऊन आलो आहे आणि ती गाडी म्हणजे आहे टाटा 'सीआरा' लवकरच ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लाँच केली जाणार आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाणार आहे या गाडीच्या फ्रंट प्रोफाइल बद्दल बोलायचं झालं तर या गाडीच्या समोर तुम्हाला ब्लॅक फिनिशिंग मध्ये ग्रील पाहायला मिळते समोरील बाजूस टाटाचा लोगो, सीआरा या नावाची पाटी येथे पाहायला मिळते तसेच इथे फ्रंट कॅमेरा पाहायला मिळतो आणि हा कॅमेरा 360 डिग्री चा आहे तसेच फ्रंट पार्किंग सेन्सर देखील येथे तुम्हाला मिळून जातात येथे फ्रंट पार्किंग सेन्सर हे दोन देण्यात आलेले आहेत तसेच समोरील बाजूतील हेडलाईट या पूर्ण एलईडी स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतील . तर महत्त्वाचा मुद्दा आहे इंजिन, या गाडीमध्ये दोन इंधन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यात पेट्रोल आणि डिझेल इंजिन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. समोरील बाजूस दोन वायपर देण्यात आलेले आहेत तसेच इथे एडास लेवल 2 चे फिचर पाहायला मिळतात साईड प्रोफाईल मध्ये बघितलं तर टाटा सियारा ची एक ओळख होती ती म्हणजे तिचा ग्लास एरिया , येथे पूर्णपणे ग्लास एरिया नसून ग्लास एरिया येथे चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. येथे क्लच टाईप डोअर बटन्स तुम्हाला पाहायला मिळतात 19 इंचाचे टायर येथे तुम्हाला देण्यात आलेले आहेत तसेच गाडीच्या आरशाला देखील कॅमेरे बसवण्यात आलेला आहे साईड प्रोफाईल मध्ये ही गाडी क्रेटा या गाडीला मॅच करून जाते.

या गाडीच्या आत देखील चांगली सुविधा देण्यात आलेली आहे गाडीची पाठीमागील बाजू ही पूर्णपणे प्लेन देण्यात आलेली आहे तसेच पाठीमागील बाजूस टर्न इंडिकेटर एलईडी स्वरूपात देण्यात आलेले आहे. तसेच पाठीमागच्या साईटला सीआरा चा लोगो देण्यात आलेला आहे तसेच पाठीमागे दोन पार्किंग सेन्सर देखील देण्यात आलेले आहेत. तसेच पाठीमागे रिवर्स कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे या गाडीचा बूट स्पेस साडे चारशे ते पाचशे लिटरचा मिळून जातो तसेच बूट स्पेस मध्ये लाईट देखील बसवण्यात आलेली आहे तसेच मागच्या बाजूला जेबीएलचा सब वूफर बसवण्यात आलेला आहे  जो की एक चांगली साऊंड कॉलिटी तुम्हाला ऑफर करून जातो. तसेच टेलगेट हा पूर्णपणे इलेक्ट्रिकल देण्यात आलेला आहे टेलगेट हा पूर्णपणे बटन कंट्रोल आहे.

गाडीच्या आतल्या साईटला जर पाहिलं तर  चांगल्या प्रकारे बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच थाई सपोर्ट तुम्ही मॅन्युअली अड्जस्ट करू शकता. या गाडीचे मटेरियल क्वालिटी बघितली तर एक चांगला अनुभव ही गाडी देऊन जाते. स्टेरिंग ही सफारी गाडी सारखीच देण्यात आलेली आहे स्टेरिंगच्या साईटला हेडलाईट कंट्रोल बटन देण्यात आलेले आहेत तसेच डाव्या बाजूस वायपरचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत. तसेच स्टेरिंग हे टिल्ट करू शकतो. तीन कनेक्टेड स्क्रीन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात.डॉल्बी ऐटमॉस चा अनुभव तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता 

तसेच समोरील बाजूस टाईप सी चा सॉकेट तुम्हाला देण्यात आलेला आहे तसेच डाव्या बाजूस दोन कप होल्डर पाहायला मिळतात गाडीच्या आतील बाजूस एलईडी लाईट देखील बसवण्यात आलेले आहेत. जे फिचर युरोपियन गाड्यांमध्ये देण्यात आली येतात ते फीचर्स या गाडीमध्ये पहिल्यांदाच देण्यात आलेले आहेत या गाडीमध्ये खूप मोठा सणरूप देण्यात आलेला आहे डोर हँडल मध्ये एक एक लिटर ची बॉटल तुम्ही ठेवू शकता. तसेच गाडीच्या पाठीमागील बाजूस बघितलं तर चांगला स्पेस पाठीमागील साईडला देखील देण्यात आलेला आहे पाठीमागील बाजूस आर्म रेस्ट आणि कप फोल्डर देखील देण्यात आलेले आहेत तसेच या गाडीमध्ये तुम्ही सन शेड देखील मॅन्युअली बसवू शकता आणि हे फीचर उन्हाळ्यामध्ये खूप उपयोगी पडते. मागील बाजूस देखील दोन टाईपची पोर्ट तुम्हाला मिळून जातात.या गाडीमध्ये सहा स्टॅंडर्ड एअरबॅग पाहायला मिळतात.या गाडीमध्ये खूप काही बदल टाटांनी यावेळेस केलेले आहेत दोन-तीन महिन्याने या गाडीचं ईव्ही व्हर्जन देखील मार्केटमध्ये येणार आहे. अजून या गाडीबद्दल बोलायचं झालं तर या गाडीमध्ये आणि गाडीच्या आत मधील बाजू रंग खूप छान वापरण्यात आलेले आहेत त्यामुळे गाडीला एक वेगळाच लूक येतो आणि गाडीच्या आत मध्ये गेल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला छान वाटते. या गाडीमध्ये व्यक्तीच्या कम्फर्ट ला जास्त महत्त्व देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये स्पेस हा भरपूर प्रमाणात देण्यात आलेला आहे जो की या गाडीला बाकीच्या गाड्यांपासून थोडी वेगळी बनवतो. गाडीच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर साधारण ही गाडी 12 लाखापासून चालू होण्याची शक्यता आहे किंवा कमी देखील असू शकते अजून या गाडीची किंमत ठरली नसून ही गाडी लवकरच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या