ही आहेत चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीची कारणे....
Cheteshwar Pujara Retirement : रोहित शर्मा , विराट कोहली आणि आर आश्विन नंतर आता चेतेश्वर पुजारा यानी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे कळलेले आहे. सोशल मीडियाचा वापर करून त्याने ही बातमी त्याच्या क्रिकेट चाहत्यांना दिली , एक भावनिक संदेश लिहीत त्याने ही बातमी सगळ्यांना सांगितली. त्याचे तेरा वर्षाचे करिअर होते 2010 मध्ये त्याला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली होती. आणि 2010 पासून ते 2023 पर्यंत तो भारतासाठी खेळत राहिला. टेस्ट क्रिकेटमध्ये राहुल द्रविड गेल्यानंतर चेतेश्वर पूजारा याला टेस्ट क्रिकेट मधील भक्कम भिंत म्हणून ओळखले जात होते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सिरीज मध्ये त्याचे खूप मोठे योगदान होते परंतु हळूहळू त्याला क्रिकेट मधून कमी करण्यात आले होते. क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याने कॉमेंट्री देखील केली पण आता त्याने आपल्या करिअरमध्ये ब्रेक घेतल्याचे सांगून दिले.
निवृत्ती चा संदेश देणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने असे सांगितले की एका छोट्या गावा मधून आलेला मुलगा ज्याने काही स्वप्न बघितले होते आणि ते स्वप्न साकार झाले ते म्हणजे भारतासाठी खेळण्याचे, त्याने या पोस्टमध्ये सगळ्यांचे आभार मानले त्यामध्ये राज्यस्तरीय क्रिकेट कोच, टीम इंडियाचे खेळाडू ,कोच , आणि त्याचे मित्रमंडळी यांचे सगळ्यांचे त्यांनी आभार मानले. तसेच त्यांनी बीसीसीआयचे ही आभार मानले. चेतेश्वर पुजारा यानी जवळजवळ सर्व महान क्रिकेटपटू सोबत क्रिकेट खेळले आहे त्यामध्ये एम एस धोनी , विराट कोहली ,रोहित शर्मा राहुल द्रविड यांचा समावेश आहे त्यांनी असे देखील म्हटले की टीम इंडियाची जर्सी घालून खेळणे म्हणजे खूप मोठा अभिमान आहे. तसेच आता सध्या सगळे सीनियर खेळाडू हे निवृत्ती घेत आहेत जसं की रोहित शर्मा ,विराट कोहली, अश्विन यांनी देखील नुकतीच निवृत्ती घेतले आहे आणि नवीन खेळाडू क्रिकेट टीम मध्ये येत आहेत. अजिंक्य रहाणे हा देखील चेतेश्वर पुजारा यांच्या सोबतीचा खेळाडू आहे पण त्याने अजून निवृत्ती घेतली नाही. असं होऊ शकतं की चेतेश्वर पुजारा पुन्हा कॉमेंट्री करताना दिसून येईल पण त्याच्या क्रिकेटच्या करिअरला त्याने आता पूर्णपणे विराम दिलेला आहे.असं वाटलं जात होतं की ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सिरीज मध्ये पुजाराला संधी मिळेल, इंग्लंड विरुद्ध झालेल्या सिरीज मध्ये पुजाराला संधी मिळेल पण असं झालं नाही. त्याचे क्रिकेट करियर खूप छान गेले आहे
क्रिकेट करियर :
त्याने असे म्हटले की लहानपणापासून एक स्वप्न होते भारतासाठी क्रिकेट खेळायचे ते स्वप्न पूर्ण झाले आणि काही आठवणी मी माझ्याजवळ साठवून ठेवल्या आहेत. सगळे जुने खेळाडू निवृत्त होत आहेत त्यामध्ये रोहित शर्मा ,विराट कोहली, अश्विन आणि आता नवीन खेळाडू येत आहेत तर जे जुने प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल तर ते असे म्हणाले की आता येणारे नवीन खेळाडू देखील खूप कार्यक्षम आहेत आणि ते भविष्य ठरवू शकतात आणि भारताचे नाव मोठे करू शकतात. आयपीएल मुळे खूप नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे आणि त्यांची कामगिरी देखील खूप चांगली आहे ते आयपीएल, वन डे क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेटमध्ये देखील भारतीय क्रिकेट टीम चे भविष्य चमकवू शकतात.
0 टिप्पण्या