Hot Posts

6/recent/ticker-posts

आताच्या सरकारने काय केलंय....?

 

आताच्या सरकारने काय केलंय....?



उद्धव ठाकरे : या निमित्ताने का होईना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले असे जर विरोधक म्हणाले तर मी त्यांना उद्या उत्तर देईल असे शिरसाव मधील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री म्हणतात, की उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारतात , त्यावर उत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही या ठिकानी येऊन भाषण करून दाखवा आणि हजार रुपये मिळवा असा टोमणा त्यांनी मुख्यमंत्री यांना मारला . ते म्हणाले की मी आज या सिरसाव गावात राहतो तुम्ही उद्या सकाळी तुमचा हेलिकॉप्टर घेऊन या आणि विकासाच बोला , या गावातले सगळे बंधारे फुटले तुम्ही कसे याल तुम्ही इथे या आणि विकासाच बोलून दाखवा असे ते म्हणाले. एक तर इथे वीज नाही ,अजून मराठवाड्यामध्ये पाणी नसते पाणी आलं तर ते थांबत नाही आज अन्नदाता स्वतः म्हणत आहे की मी खाऊ काय यांच्यासमोर मी काय विकासाचे बोलू, जे सर्व कर्जबाजारी आहेत त्यांना मी विकासाबद्दल काय बोलू, यांचे उद्योगपती मित्र कर्ज मुक्त होत आहेत, माझा शेतकरी यांच्या उद्योगपती मित्रान सारखा लबाड ढोंगी नाही तो प्रामाणिक आणि मातीचा इमान राखणारा आहे आणि ज्यावेळेस त्यांना नोटीस येते, त्यांना असे वाटते की आपली अब्रू जात आहे आता मी जगू कसा म्हणून तर तो जीव देतो ध्येय सोडतो पण देश कधी सोडत नाही. घर सोडून फिरणारे हे मुख्यमंत्री काय करतील. 

आज माझा महाराष्ट्राचा शेतकरी संकटात सापडला आहे एकही मंत्री यांच्याकडे फिरकला देखील नाही माझा शेतकऱ्याची परिस्थिती जाणून घेतली नाही असं ते म्हणाले. त्यांनी शेतकऱ्यांना विचारले की पिक विमा साठी किती खर्च झाला अशी सगळी माहिती त्यांनी काढली . ते म्हणाले की पिक विम्याचे पैसे हे खूप कमी येत आहेत . माझ्या शेतकऱ्यांना फसवू नका त्यांच्या हक्काच्या पैशावर दरोडा टाकू नका. जर तुम्ही वेळोवेळी शेतकऱ्याच्या पीक विम्याचे पैसे दिले नाहीत तर आम्ही सर्व शेतकरी तुमचा ऑफिसमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार दगाबाज सरकार आहे , या सरकारने असं वक्तव्य केलं होतं की आम्ही शेतकऱ्याचे सर्व कर्ज माफ करू नाहीतर मी पवार असं नाव लावणार नाही असे अजित पवार म्हणले होते असे उद्धव ठाकरे यावेळेस म्हणाले. ते म्हणाले की आमच् एवढेच म्हणणं आहे आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या , जर तुम्ही शेतकऱ्यांना वेळेवरती योग्य भाव दिला , त्यांचे कष्टाचे पैसे दिले तर कोण तुमच्याकडे भीक माघायला येणार आहे शेतकरी काही भिकारी नाही असं विधान त्यांनी विरोधी पक्षाला केले. आम्हाला काय हाऊस नाही की आम्ही सारखं कर्जमाफी द्या म्हणून लढू, जर आमचं पीक विमा आला असता वेळोवेळी योग्य भाव मिळाला असता तर आम्ही सारखे कर्ज माफी ,कर्ज माफी करत तुमच्याकडे आलो नसतो. 

आताच्या सरकारने काय केलंय की मुहूर्त काढलाय यांनी जून मध्ये मुहूर्त काढलाय असं ते म्हणाले. त्यांनी असा सवाल केला की मी मानतो तुम्ही 30 जूनला कर्जमाफी द्याल पण आम्ही आत्ताच्या कर्जाचे हफ्ते फेडायचे की नाही  हे तुम्ही मला सांगा असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. यांनी शेतकऱ्यांची मस्करी लावली आहे नुसते मत मागत फिरणे यांची काम आहेत खोटी आश्वासन देऊन त्यांनी तुम्हाला फसवलं आहे आणि आता मत चोरी देखील केली जात आहे ते म्हणाले हि मत चोरी नाही तर मत दरोडा आहे राहुल गांधी यांनी घेतलेल्या मीटिंगमध्ये एक असा मुद्दा सांगितला आणि यांची मत चोरी उघडकीस आली ती म्हणजे एका महिलेचे नाव 22 ठिकाणी लावण्यात आलं आणि तिच्या नावावर मते खाण्यात आली आणि ती महिला ही ब्राझीलची होती असं त्यांनी म्हटले. 

त्यांनी शेतकऱ्यांना असे आवाहन केले की तुम्ही एकवट व्हा आणि लढा द्या. शेतकऱ्यांची ताकद काय आहे ते दाखवून द्या. हे फक्त हिंदू मुस्लिम वाद घालण्याचा प्रयत्न करत आहेत असे ते म्हणाले आम्ही रस्ते करू सगळी कामे करू असं ते म्हणतात आणि कॉन्ट्रॅक्टर चे खिसे भरतात आमचं नातं हे खूप चांगला आहे आम्ही तुमच्या सोबत जोडलो गेलेलो आहे ते म्हणाले की मध्ये एकदा छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढला पण तरीसुद्धा यांचं डोकं ठिकाणावर येत नाही असं दिसून येत आहे असे ते म्हणाले. माझं एकदा अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरच्या अधिवेशनातच मी जाहीर केलं होतं ते माझ्या शेतकऱ्यांना मी एक लाखापर्यंत कर्जमाफी देतो. महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजना मी जाहीर करून अंमलबजावणी करून दाखवली होती ती सर्व माहिती सरकार जवळ आहे त्या योजनेचा सरकारने दुसरा टप्पा काढावा दोन-तीन महिन्यांमध्ये कर्जमुक्ती करून दाखवली होते तशी कर्जमुक्ती जूनच्या आत या सरकारने करून दाखवली पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या