Hyundai ने लॉन्च केली नवीन कार...
Hyundai New Car : नमस्कार मित्रांनो हुंडाई ची नवीन गाडी नुकतीच लॉन्च झाली आहे तिचं नाव आहे व्हेनयू नेक जनरेशन आहे. या गाडीचा फ्रंट लूक खूप छान आहे बाकीच्या कंपन्यांनी या गाडीकडून मटेरियल क्वालिटी आणि फिनिश लेवल कशी द्यायची हे शिकले पाहिजे या गाडीमध्ये तीन इंजिन ऑप्शन दिलेले आहेत जे की आधी देखील दिले गेले होते ,पण डिझेल ऑटोमॅटिक पहिल्यांदाच या गाडीमध्ये देण्यात आलेले आहे आधी बघायला गेलं तर डिझेल ऑप्शन होता पण मॅन्युअल मध्ये होता. या गाडीची किंमत जर पाहिली तर 7.90 लाख या किमती पासून गाडीची स्टार्टिंग प्राईस चालू होते. बाकीच्या प्राईस विषयी अजून ह्युंडाईने माहिती दिलेली नाही.
फीचर्स :
या गाडीच्या फ्रंट प्रोफाइल बद्दल बोलायचं झालं तर या गाडीचा समोरचा लुक हा जुन्या पद्धतीचा दिसून येतो गाडीच्या समोरील हेडलाईट एलईडी स्वरूपात बघायला मिळतात . टर्न इंडिकेटर देखील पाहायला मिळतात आणि या गाडीमध्ये चांगल्या क्वालिटीचे मटेरियल वापरण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये फ्रंट पार्किंग सेन्सर आहेत. सहा फ्रंट पार्किंग सेंटर या गाडीमध्ये पाहायला मिळतात तसेच 360 डिग्री कॅमेरा देखील पाहायला मिळतो एडास चा कॅमेरा या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे गाडीच्या लांबी बद्दल बोलायचं झालं तर चार मीटर इतकी या गाडीची लाबी असणार आहे तसेच गाडीच्या उंची बद्दल बोलायचं झालं तर गाडीची उंची ही आधीच्या वेन्यू पेक्षा 48 mm नी वाढलेली आहे. म्हणजेच ही गाडी टॉल डिझाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळते महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाडीचा प्लॅटफॉर्म हा K1 प्लॅटफॉर्म आहे जे की किया या गाडीमध्ये पाहायला मिळतो म्हणजेच या गाडीचे मटेरियल क्वालिटी ही तुम्हाला खूप चांगली पाहायला मिळते गाडीच्या वरच्या बाजूस रूपरेल देखील देण्यात आलेले आहेत तसेच नॉर्मल साईजचा सनरूफ देखील दिला गेलेला आहे तसेच गाडीच्या काचेला सन शेड देखील कंपनीने उपलब्ध करून दिलेले आहेत जे की उन्हापासून संरक्षण करते हे खूप चांगलं फिचर या गाडीमध्ये देण्यात आलेल आहे गाडी चा कलर हा ब्लॅक देण्यात आलेला आहे जे की या गाडीला खूप आकर्षित बनवतो या गाडीमध्ये 45 लिटरचा फ्युएल टॅंक मिळून जातो तसेच डिस्क ब्रेक देखील या गाडीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे
गाडीच्या मागच्या बाजूला देखील सेन्सर देण्यात आलेले आहे म्हणजे गाडीच्या चारी बाजूस सेंसर बसवले आहेत ,रिव्हर्स कॅमेरा तसेच फ्रंट कॅमेरा यामध्ये बसवण्यात आला आहे. जी आधीची हुंडाईची वेन्यू ही गाडी आहे त्या गाडीपेक्षा चांगला बूट स्पेस या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे जवळपास हा बूट स्पेस 375 लिटरचा असणार आहे या गाडीमध्ये बोट या कंपनीचे स्पीकर देण्यात आलेले आहेत टोटल या गाडीमध्ये आठ स्पीकर देण्यात आलेले आहेत डोअर हँडल चांगल्या पद्धतीची वापरण्यात आले आहे तसेच या गाडीमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स तुम्हाला बघायला मिळतील लवकरच या गाडीचे EV वर्जन मार्केटमध्ये येणार आहे. गाडीच्या आतील बाजूस तुम्हाला स्टेरिंग जवळ दोन डिस्प्ले बघायला मिळतील हे डिस्प्ले 12.3 इंचाचे आहेत आणि हे कर्वड डिस्प्ले आहेत ड्रायव्हिंग सीट जवळ आर्म रेस्ट ,कफ फोल्डर आणि कॅमेरा कंट्रोल, पार्किंग सेन्सर चे बटन पाहायला मिळतात तसेच समोरील बाजूस चार्जिंग पॉइंट देण्यात आला आहे तसेच गाडीच्या पाठीमागच्या सीट जवळ मोबाईल ठेवण्यासाठी जागा चार्जिंग पोर्ट, आर्म रेस्ट, कफ फोल्डर हे देखील मागच्या साईटला देण्यात आलेले आहे. तसेच मागचे शीट चे पोर्ट डबल देण्यात आलेले आहेत. या गाड्यांमध्ये तीन इंजिन ऑपशन देण्यात आले आहेत यामध्ये दोन पेट्रोल आणि एक डिझेल. या गाडीच्या चाका बद्दल बोलायचं झालं तर या गाडीची चाके 16 इंचाचे देण्यात आलेले आहेत या गाडीमध्ये ग्राउंड क्लिअरन्स हा कमीत कमी 190 ते 195 एमएम चा देण्यात आलेला आहे .
गाडीच्या पाठीमागे रिफ्लेक्टर देखील देण्यात आलेले आहे गाडीच्या पाठीमागे तीन लोक आरामशीर प्रवास करू शकतात. को ड्रायव्हर सीट हे मॅन्युअली अड्जस्ट करू शकतो ड्रायव्हर साईटची सीट इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकतो. गाडीच्या आतील बाजूचे सर्व मटेरियल हे खूप छान असून ते अँटी स्क्रॅच बसवण्यात आलेले आहे आपण या गाडीची कॅमेरा कॉलिटी जर बघितली तर कॅमेरा क्वालिटी ही देखील खूप चांगली देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही गाडी रिव्हर्स घेताना स्पष्टपणे मागच्या बाजूच्या अडचणी पाहू शकता. एसी बँड बद्दल बोलायचं झालं तर हे देखील खूप चांगल्या क्वालिटीचे पाहायला मिळतात या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो एप्पल कार प्ले देण्यात आलेला आहे. गाडीच्या चावी बद्दल बोलायचं झालं तर गाडीची चावी ही हुंडाई च्या लोगो सारखी बनवण्यात आलेली आहे. ड्रायव्हिंग सीट जवळ आर्म रेस्ट खाली स्टोरेज स्पेस देण्यात आलेला आहे. ही गाडी खूप चांगल्या पद्धतीने बनवण्यात आलेली आहे जी वापरण्यास खूप सोपी आणि कंफर्टेबल आहे.
0 टिप्पण्या