Shah Rukh Khan : मनोरंजनाच्या दुनियेतील एक नवीन खबर नुकतीच आली आहे यामध्ये अभिनेता शाहरुख खान याने नुकताच 2025 चा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. शाहरुख खानचा जवान हा चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता या चित्रपटाला हा राष्ट्रीय पुरस्कार त्याच्या सर्वोत्कृष्ट अभिनय या क्षेत्राला मिळाला आहे. जवळजवळ ३३ वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना त्याला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. चित्रपट सृष्टी मध्ये त्याला किंग खान असे संबोधले जाते तर चित्रपटसृष्टी मधील तीन खान यांच्यापैकी शाहरुख खान देखील एक आहे.
काही जणांना आश्चर्य वाटत आहे की शाहरुख खान यांनी यापूर्वी खूप सार्या चित्रपटांमध्ये काम केले असताना त्यावेळेस त्याला हा पुरस्कार भेटला नाही शाहरुख खान याने समाजाचे प्रतिबिंब किंवा समाजाबद्दल भाष्य करणारे चित्रपट किंवा संदेश देणारे चित्रपट खूप केले आहेत, जसे की चक दे इंडिया, स्वदेश, माय नेम इज खान यासारखे अनेक चित्रपट केले आहेत पण त्याला राष्ट्रीय पुरस्कार कधीच मिळाला नव्हता त्याच्या 'जवान 'या चित्रपटाला यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यंदाच्या वेळेस चे राष्ट्रीय पुरस्कार हे थोडे बदलताना दिसत आहेत यापूर्वी केवळ सामाजिक विषयावरील चित्रपटांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत होता. जर तुम्ही जवान चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की हा चित्रपट अनेक समाजावरील मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतो आणि मनोरंजन देखील करतो या चित्रपटामध्ये अनेक मुद्दे जसे की शेतकऱ्यांची आत्महत्या ,हॉस्पिटलमध्ये कमी पडत असलेले ऑक्सिजन तसेच भ्रष्टाचार आणि मतदान यासारखे मुद्दे या चित्रपटात मांडण्यात आले होते.
शाहरुख खान हा 59 वर्षाचा असून त्याने चित्रपटसृष्टीमध्ये येताना खूप कष्ट केले आहेत तर चित्रपट सृष्टीमध्ये आल्यानंतर देखील खूप संघर्षाचा सामना करत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत ,तर वैयक्तिक अडचणी म्हणजे मुलाबद्दल झालेले ड्रग्स प्रकरण तसेच वारंवार येणारे फ्लॉप चित्रपट असे अनेक संकटे सहन करून पुन्हा आपल्या चित्रपटानुसार काम दाखवून तो हिट झाला आहे . फक्त कमी राहिली होती ती राष्ट्रीय पुरस्काराची आणि तेही त्याने पूर्ण केली. शाहरुख खान सोबत हा राष्ट्रीय पुरस्कार आणखी एका अभिनेत्याला मिळाला आहे त्याचं नाव विक्रांत मेस्सी आहे या अभिनेत्याला हा पुरस्कार त्याच्या गाजलेला चित्रपट '१२ फेल 'यासाठी मिळाला आहे. हा चित्रपट एका सामाजिक मुद्द्यावर बनवला गेला असून यामध्ये एका मुलाची कहाणी दाखवण्यात आली आहे त्यात तो एका छोट्याशा गावामधून येऊन आयपीएस बनून दाखवतो आणि हा चित्रपट एक खूप प्रेरणादायी चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. 'विक्रांत मेसी' यांनी खूप कमी वयात राष्ट्रीय पारितोषिक कमावले आहे पण शाहरुख खान याला हा पुरस्कार मिळवण्यासाठी तब्बल 30 वर्षाचा कालावधी घालवावा लागला. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खान याने जनतेचे,जवान चित्रपटाच्या डायरेक्टर चे आणि आणि सरकारचे आभार मानले तसेच त्याचा मित्रपरिवार आणि टीम मेंबर्स यांचे देखील त्यांनी आभार मानले. तो म्हणाला की अभिनय हा फक्त अभिनय नसून एक जिम्मेदारी आहे पडद्यावर खरं दाखवण्याची . शाहरुख खान कडे चित्रपट सृष्टी मधले जवळजवळ सर्वच पुरस्कार आहेत पण राष्ट्रीय पुरस्कार नव्हता याची त्याला खंत वाटत होती पण ती इच्छा आता पूर्ण झाली आहे.
शाहरुख खानचा चित्रपट सृष्टीतील प्रवास :
एक असा काळ होता ज्यावेळेस दिल्लीमध्ये राहणारा हा एक मुलगा म्हणजे शाहरुख खान त्याला कोण ओळखत नव्हते पण आज तो भारतातला नव्हे तर जगातील मोठा स्टार म्हणून ओळखला जातो ज्या माणसाला मुंबईमध्ये येऊन जेवणाचे पैसे देखील नसायचे तो माणूस म्हणजे शाहरुख खान 6000 कोटी चा मालक आहे. याची सुरुवात 2 नोव्हेंबर 1965 पासून झाली जेव्हा शाहरुख खानचा जन्म झाला त्याच्या वडिलांचे नाव वीर ताज मोहम्मद होते. शाहरुख खानचा सिनेसृष्टीतील पहिला रोल हा हा त्याच्या 'दिल दर्या' या नावाच्या सिरीयल मध्ये मिळाला पण ती सिरीयल काही कारणास्तव एक वर्षानंतर रिलीज करण्यात आली, त्याच वेळेस त्याने ' फौजी ' नावाची सिरीयल केली आणि तो टेलिव्हिजनवर झळकला असेच रोल मिळत असताना तो मुंबईत गेला आणि त्याला मुंबईत अनेक चित्रपटांमध्ये रोल मिळाला त्यामध्ये त्याचा पहिला रोल हा हेमा मालिनी दिग्दर्शित 'दिल आसमा हे' या चित्रपटात मिळाला. त्याच्यानंतर तो दिवाना या चित्रपटात झळकला यानंतर बाजीगर चित्रपटात त्याला रोल मिळाला आणि तो चित्रपट हिट ठरला असे चित्रपट करत त्यांनी बॉलीवूड मध्ये दोन वर्षात चांगले नाव कमावले. बाजीगर सारख्या आगळ्यावेगळ्या चित्रपटात काम करून तो स्टार बनला आणि त्याला तिथून पहिला फिल्मफेअर पुरस्कार बेस्ट अभिनेता म्हणून मिळाला.
0 टिप्पण्या