शिव्या दिल्या तरीही मी समाजासाठी काम करत राहील - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस : मराठा समाजाच्या काही मागण्या पूर्ण केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे ते असे म्हणाले की,मला अतिशय आनंद आहे की एक चांगला तोडगा मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे आणि जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण आता संपवण्यात आल आहे खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरिता आमची सुरुवातीपासून तयारी होती पण त्यातला महत्वाचा विषय असा होता की मनोज जरांगे पाटील यांची ही मागणी होती सरसकटची, त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी ही होत्या हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय बघता अशाप्रकारे सरसकट करणे हे शक्य नव्हतं आणि विशेषतः आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून देण्यात आली, मंत्रिमंडळ उप समितीतील जी काही टीम होती त्यांच्या हे लक्षात आणून दिलं .
आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायच असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही हे कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील ती भूमिका समजून घेतली स्वीकार केली आणि त्यांनी सांगितलं की जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका,आणि मंत्रिमंडळ समितीने याबद्दलच्या सगळ्या चर्चा पूर्ण केल्या त्याचा जीआर तयार झाला त्याच्यात जे काही बदल होते त्याचा बदल आपण केला आणि तो जीआर देखील पुढे आलेला आहे आणि इतर ज्या काही मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उप समितीने मान्य केल्या त्यामुळे एकूणच पहिल्यांदा तर मला श्री राधाकृष्ण विखे पाटील जे मंत्रिमंडळ उप समितीचे अध्यक्ष होते आणि मंत्रिमंडळ उपसमितीतील सर्व जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांचे आमच्या मंत्र्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करायचा आहे की त्यांनी सातत्याने बसून एकेका गोष्टीचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात चर्चा करून या ठिकाणी हा मार्ग काढला आहे ,आणि आता हा मार्ग निघाल्यामुळे मुळातच जे मराठवाड्यात राहणारे आमच्या मराठा समाजाचे लोक आहेत यांचा कधीकाळी त्यांच्या रक्त नात्यातला कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झालेला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने हे सर्टिफिकेट देता येतं आणि हैदराबाद गॅझेटमुळे अशा प्रकारच्या नोंदी शोधणे हे सोप होणार आहे.
आणि त्यातून फॅमिली ट्री बसवून अशा प्रकारच आरक्षण देता येणार आहे म्हणजे एकीकडे ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते आरक्षण मिळेल आणि जी ओबीसी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर तशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही ,ज्यांचा खरा क्लेम आहे पण तो कागदपत्राच्या अभावी त्यांना तो मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषता हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाडा मध्ये होता कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाहीत आणि म्हणून मराठवाडा करिता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता आणि मराठवाड्यातून काही इतरही भागात राहायला गेलेले लोक आहेत त्यांच्याही करिता महत्त्वाचा होता मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवेधानिक तोडगा आम्ही काढू शकला आहोत एक असा तोडगा काढू शकलो की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातून लोकांना फायदा होईल आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतः ही मंत्रिमंडळ उप समितीच्या कामावर समाधानी आहे त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेल आहे मी त्यांचे अभिनंदन करतो .
या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला खरं म्हणजे त्या संदर्भात मी मुंबईकरांची दिलगिरी देखील व्यक्त करतो मला असं वाटते की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतला आहे असे ते म्हणाले ते असेही म्हणाले की राजकारणामध्ये टीकाही सहन करावी लागते आणि लोक तुमचं स्वागत देखील करतात जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकांसमोर येणार नाहीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना निर्माण होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल, कायदेशीर निर्णय करावा लागेल म्हणून यासंदर्भात जे जे कायदेशीर आहे त्या संदर्भात अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि याचं श्रेय हे आपल्या मंत्रिमंडळ उप समितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे ज्यांनी खूप मेहनत त्याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल . मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी समाजासाठी काम कालही करत होतो ,आजही करतो आणि उद्याही करेल मराठा समाज असू द्या ओबीसी समाज असू द्या किंवा महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरिता काम करणे हे मी माझं कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात असे ते म्हणाले.
0 टिप्पण्या