रेनॉल्ट ने आपली नवीन 'कायगर फेसलिफ्ट' ही कार लॉन्च केली आहे...
Renault Kiger Facelift 2025 :नुकतीच रेनॉल्ट ने आपली नवीन 'कायगर फेसलिफ्ट' ही कार लॉन्च केली आहे. याच्यापूर्वी रेनॉल्ट ने ट्रायबर ही गाडी नवीन फीचर्स सहित लॉन्च केली होती त्यामुळे निश्चित असं ठरलं होतं की ट्रायबर ही गाडी लॉन्च केली तर 'कायगर' ही गाडी देखील नवीन फीचर्स सहित लॉन्च होणार आणि तसं झालं. पण या वेळेस कायगर गाडीत खूप काही बदल केलेले आहेत ,फीचर्स या गाडीचे थोडे कमी जास्त झाले आहेत आणि या गाडीची किंमत सहा लाख 29 हजार पासून ते 11 लाख 29 हजार पर्यंत ठेवली आहे. सुरुवात करूया चावी पासून , या गाडीच्या चावी मध्ये चार बटन दिलेले असून या गाडीची चावी ची डिझाईन खूप चांगली बनवली गेली आहे. गाडीचा समोरचा लोगो देखील थोडा मोठा करण्यात आलेला आहे. गाडीच्या बोनेट मधील देखील थोडा बदल करण्यात आलेला आहे त्यामध्ये बोनेट ची डिझाईन थोडीशी मोठी आणि वेगळी करण्यात आलेली आहे. गाडीच्या समोरील एलईडी लाइट्स ह्या पहिल्यासारख्याच पाहायला मिळतात.
गाडीच्या साईडला जास्त काही बदल झालेला दिसून येत नाही. गाडीच्या उजव्या बाजूच्या आरशाजवळ एक कॅमेरा लावलेला आहे तसेच गाडीच्या समोर बाजूच्या बरोबर मधोमध एक कॅमेरा लावलेला आहे. गाडीच्या इंटरनल सिस्टीम मध्ये देखील खूप बदल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये इंटरनल रंग बदलण्यात आले आहेत. डिझाईन मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. यामध्ये 360 डिग्री कॅमेरा नसून मल्टी व्ह्यू कॅमेरा बसवण्यात आला आहे. त्यामध्ये गाडीच्या समोरील व्ह्यू तसेच गाडी मागे घेत असताना पाठीमागचे चित्र किंवा व्ह्यू दिसेल. तसेच या गाडीमध्ये व्हेंटिलेटर सीट्स नवीन प्रकारे बसवण्यात आले आहेत ज्यामुळे गाडीला एक नवीन लुक मिळत आहे. तर गाडीमध्ये टोटल 6 एअर बॅग बसवण्यात आले आहेत हा पण एक बदल या गाडीमध्ये करण्यात आला आहे.
या गाडीचे इंजिन हे पहिल्या गाडी सारखेच आहे यामध्ये काही बदल करण्यात आलेला नाही. तरी या गाडीवरती असलेले रूप रेल हे खूप मजबूत बसवण्यात आले आहे जे की 50 किलो पर्यंत वजनाचे सामान घेऊन जाऊ शकते. गाडीच्या पाठीमागील बाजूस एलईडी लाईट्स लावण्यात आलेले आहेत. बूट स्पेस मध्ये देखील खूप जास्त जागा दिलेली आहे. तसेच या रेनॉल्ट कंपनीने एक नवीन कलर लॉन्च केला आहे तो म्हणजे लाईट येलो. स्टेरिंग बद्दल बोलायचं झालं तर स्टेरिंगच्या मधोमध रेनॉल्ट चा एक नवीन लोगो आणि गाडीच्या इंटरियर मध्ये खूप जागा सामान ठेवण्यासाठी दिली गेलेली आहे. इंटिरियर मध्ये गाडीच्या पाठीमागच्या सीटवर जास्त काही बदल करण्यात आलेला नाही गाडीच्या आत मधील सगळे सीट हे लेदरने बनवले गेले आहेत. मागच्या बाजूस दोन्ही सीटच्या मध्ये मोबाईल ठेवण्यासाठी जागा दिले गेलेली आहे . गाडीच्या पाठीमागच्या सीटच्या समोर एक 12 वॅट यूएसबी पोर्ट दिला गेलेला आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता. तर या गाडीमध्ये सनरूप पाहायला मिळत नाही.
किंमत :
या गाडीच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर या गाडीची किंमत सुरू होते सहा लाख 29 हजारापासून ते 9 लाख 14 हजार पर्यंत ही किंमत फक्त NA व्हेरिएंट्स साठी आहे. टर्बो वेरीएंट साठी या गाडीची किंमत चालू होते नऊ लाख 99 हजार पासून ते 11 लाख 29 हजारापर्यंत. तर या गाडीमध्ये जास्त काही बदल झालेले दिसून येत नाही.या गाडीमध्ये दोन पेट्रोल इंजिनचे पर्याय देण्यात आलेले आहेत. एक लिटर 'टर्बो चार्ज' पेट्रोल इंजिन आणि एक लिटरचा नॅचरल पेट्रोल इंजिन असे दोन पर्याय आहेत.
या गाडीच्या एलईडी या आईस क्यूब आहेत या लाइट्स मध्ये दोन कमी बीम तर एक जास्त बीम अशा पद्धतीच्या लाईट तुम्ही वापरू शकता. टर्न इंडिकेटर आणि डी आर एल देखील खूप चांगल्या पद्धतीने या गाडीत वापरण्यात आलेले आहे. असा अंदाज लावला जात होता की या गाडीमध्ये सीएनजी इंधन पर्याय देण्यात येईल पण या गाडीमध्ये सीएनजी चा पर्याय दिलेला नाही. ज्यांना अशी इच्छा आहे की कमी बजेटमध्ये स्पोर्ट सारखी गाडी पाहिजे त्यांनी टर्ब इंजिन ची गाडी घेण्यास काही हरकत नाही. साईड प्रोफाइल बद्दल बोलायचं झालं तर 205 एमएम चा ग्राउंड स्पेस येथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. गाडीच्या समोरील बाजूस 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे.
तसेच पाठीमागच्या बाजूस रिव्हर्स सेंसर कॅमेरा देण्यात आलेला आहे. बूटस्पेस हा जवळजवळ 4 ते 5 लिटर पर्यंत आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला लागणारे सामान ठेवू शकता. डिस्प्ले स्क्रीन ही 8 इंचाची आहे. वायरलेस चार्जिंगचा पॉईंट या रेनॉल्ट कारमध्ये देण्यात आलेला आहे. गाडीच्या पाठीमागच्या सीट खाली एकदम सपाट फ्लोर तुम्हाला देण्यात आलेला आहे. सीट बेल्ट देखील या कारमध्ये चांगल्या प्रकारचे वापरण्यात आलेले आहेत तसेच गाडीमधील सीट्स हे एक प्रीमियम पद्धतीचे आणि लेदरने बनवलेले आहेत. या गाडीमध्ये बरेच बदल केलेले असतील तरी देखील पाहिजे तसे बदल या गाडीमध्ये बघायला मिळत नाही. हे आहेत या नवीन गाडीचे फिचर्स जे की कमी बजेटमध्ये पाहायला मिळतात.
0 टिप्पण्या