.....आणि जर असं झाले नाही तर माझं नाव मनोज जरांगे पाटील नाही.
मनोज जरांगे पाटील - शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून आंदोलन सुरू केल गेल आहे. हे आंदोलन अमरावती मध्ये सुरू असून नुकताच मराठा आंदोलन मनोजजरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आहे तर या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत बच्चू कडू यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि जर मागण्या पूर्ण होत नसतील तर रस्त्यावर उतरण्याचे आव्हान जनतेला केले आहे. उपोषण करताना काय त्रास होतो हे मला माहिती आहे आणि या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या आपण शेतकऱ्यांचे लेकर आहोत असे म्हणत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले.
कोणा कोणाचा पाठिंबा ?
बच्चू कडू यांच्या पाठीशी उभे राहा आणि एक दिवस रस्ते जाम करा तसेच एक बैठक घ्या एक तारीख ठरवा आणि रस्ते जाम करा आणि जर असं झाले नाही तर माझं नाव मनोज जरांगे पाटील नाही असं त्यांनी म्हटले आहे.एक दिवस ठरवून पूर्ण राज्य बंद करावे आणि जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत राज्य बंद ठेवावे असेही मनोज जरांगे म्हणाले. हे आंदोलन कुठल्या जातीच पक्षाचा आणि धर्माचं नसून ते शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा नेता आपले भाऊ मोठ्या ताकतीने खूप वर्षापासून संघर्ष करत आहेत आज आमचा नेता शेतकऱ्यासाठी जीव द्यायला तयार आहे असेही जरांगे पाटील म्हणाले.
काय म्हणाले बच्चू कडू ?
सरकारने सरकारचं कर्तव्य करावं आम्ही आमचं कर्तव्य करत आहे सरकार जो निर्णय घेईल तो त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही लढत राहू. बावनकुळे यांची फोनवरची भाषा दादागिरी आणि दमदाटीची होती ते आम्ही सहन करणार नाही असे बच्चू कडू म्हणाले. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेने आंदोलन करण्यास सांगितले आहे आणि स्वतःला आणि दुसऱ्यांना इजा करू नका आपण शांततेने हे आंदोलन 14 तारखेपर्यंत करणार आहोत 14 तारखेनंतर आपण आपली भूमिका बदलू असे बच्चू कडू म्हणाले. तसेच बच्चू कडू यांना पाठिंबा मिळत असून शरद पवार यांनी देखील त्यांची चौकशी केली आहे तसेच लक्ष्मण हाके यांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
0 टिप्पण्या