Hot Posts

6/recent/ticker-posts

आमच्यात गद्दारी बनवली आणि तुम्ही आमचं सरकार पाडले....

आमच्यात गद्दारी बनवली आणि तुम्ही आमचं सरकार पाडले....




उद्धव ठाकरे  -  माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे असे म्हणतो असे म्हणाले  त्यांनी सर्व मराठी व हिंदू नागरिकांचे आभार मानून भाषनास सुरुवात केली  राजने खूप अप्रतिम मांडणी केली आहे माझ्या भाषणाची काही गरज नाही असे ते म्हणाले आज आमच्या भाषणापेक्षा आज आमचं एकत्रित दिसणे हे खूप महत्त्वाच आहे.आमच्या दोघांचा अंतर पाठ आता दूर झालेला आहे ,आम्ही एकत्र आलोय म्हणजे एकत्र राहण्यासाठीच भाषा ही खूप महत्त्वाचे असते ,आणि ती आपण पाळलीच पाहिजे असे वक्तव्य त्यांनी केले.मी राज आणि सगळ्यांनी  मराठीचा मान राखलाच पाहिजे .भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही मराठी माणूस जर न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल तर आम्ही गुंड आहोत असेही ते यावेळी म्हणाले न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाहीये.  मुंबई ही मराठी माणसाने मिळवलेली आहे  जे म्हणतात ना आम्ही मराठी आहोत त्यांचा रक्त तपासावे लागेल.  देश  एक असला पाहिजे संविधान एक असला पाहिजे  निशान सुद्धा एकच असले पाहिजे.  मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली होती आणि केलीच याचा मला अभिमान आहे.  

महाराष्ट्र मध्ये मराठीची सक्ती केल्यानंतरही काही लोक कोर्टामध्ये गेले ती गुंडगिरी नाही का असे ते म्हणाले.  हे म्हणतात शिवसेनेने आजपर्यंत काय केलं मराठी माणूस यांनी मुंबई बाहेर नेला असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. आम्ही सगळं करत  होतो पण तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आमच्यात गद्दारी बनवली आणि तुम्ही आमचं सरकार पाडले याचं कारण तुमचे दोन मालक जे बसलेले आहेत ते दोन व्यापारी त्यांचे बूट चाटण्याचं काम तुम्ही करत आहेत प्रत्येक वेळी काय झालं की राज आणि माझ्यात भांडण लावायची काम यांनी केली आहेत आणि आता देखील तेच होणार काय जण म्हणतात की यांचा  म मराठीचा नाही तर म महापालिकेचा आहे तर त्यांना सांगू इच्छितो की हा म महापालिकेचा आणि मराठीचा नसून आमच्या महाराष्ट्राचा आहे. 

आमच्या शिवसेनाप्रमुखांनी सांगितले आहे ,सत्तेचं काय आहे सत्ता येतेआणि जाते  पण आपली ताकद ही आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे दरवेळेला संकट आले की आपण मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपणच एकमेकांमध्ये भांडण लावतो हा नतं कष्ट पणा आता करायचा नाहीये. कारण गेल्या विधानसभेत जे त्यांनी केलं बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं हे हिंदू मुसलमान करत आहेत हिंदू मुसलमान तर केलच पण त्यांनी खास करून केलं ते मराठी आणि मराठ्यांमध्ये केलं यांची नीती आहे अशीच आहे जे गुजरातमध्ये त्यांनी केलं तेच ते  महाराष्ट्र मध्ये मध्ये करायला बघतात.  मराठी माणूस मराठी माणसाशी भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले  आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या का ? नुसते पालखीचे बळी होणार का, मराठी माणसाला कधी त्या पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात.  मी पेपर मध्ये बघितला आमचे पंतप्रधान जगभर फिरत आहेत गळ्यात मोठा पट्टा इकडे घाण आणि तिकडे घाना ,स्टार ऑफ घाना  लाज वाटली पाहिजे असे ते म्हणाले. कालच पेपर मध्ये बातमी आली होती लाडक्या बहिणीचा पोर्टल आता बंद, बसा बोंबलत आता त्याहून ही सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असेल तर ते महाराष्ट्र मध्ये आहेत.  का तुम्ही आमची मराठी मारतात का तुम्ही आमच्यावरती सक्ती करत आहात अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत पण आमच्यावर सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय आहे ते आम्ही तुम्हाला असे दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकं वर नाही काढणार.

आज आपण सगळे एकत्र आलो आहोत तर पुन्हा आपल्या मध्ये काड्या घालण्याचे उद्योग होतील कारण त्यांचा धंदा तोच आहे मी नेहमी सांगतो कोणाच्याही लग्नामध्ये भाजपवाल्यांना बोलू नका. येतील मस्त खाऊन  बसतील आणि नवरा बायकोच भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील असे ते म्हणाले.  यांचा स्वतःचा असं काहीच नाहीये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि 57 ची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला. आज आपल्या मुंबईच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत आज सगळ्यात जास्त जर मुंबईमधल्या जमिनीचा मालक कोण असेल तर तो यांच्या मालकाचा मित्र आहे "अदानी " कोणाची जागा कोणी रक्त सांडलं आणि कोण या जागेचा मालक झाला तुम्हीच सांगा. 

आमचा हनुमान चालीसा ला विरोध नाही पण मारुती स्तोत्र आम्हाला का विसरायला लावताय.आमचा जय श्रीराम ला विरोध नाहीये पण भेटल्यानंतर राम राम हे म्हणणारे आम्हीच मराठी असे ते म्हणाले तर ते असेही म्हणाले की हे राजकारणातले व्यापारी आहेत वापरा आणि फेका. तो एक गद्दार काल बोललाय जय गुजरात, ते म्हणाले की तुम्ही पुष्पा पिक्चर पाहिला असेल त्यामध्ये तो म्हणतो  झुकेगा नही साला तसे हे गद्दार म्हणतायेत उठेगा नाही साला,  कुछ भी बोला उठेगा ही नहीअशी गंमत शिर टीका त्यांनी त्यांच्यावर केली. आपला मालक आला म्हणून जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का असे ते म्हणाले.  कोणावरी अन्याय करू नका तुमच्या अंगावर जर कोणी हात उगारला  तर तो हात जागेवरती कोणी ठेवू नका. 

 तर त्यांनी देवेंद्र फडणवीस वर ही टीका केली आणि म्हणाले  देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी तुम्ही सहन करणार नाही असे म्हणतात पण मला एक मराठी माणूस असं दाखवा जो बाहेरच्या राज्यात जाऊन गुंडगिरी करू शकेल आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली तर तुम्ही आमची वाट अडवू नका असे ते म्हणाले.  मी आज महाराष्ट्राला विनंती करतो आणि आव्हान करतोय यापुढे आपण कोणत्याही पक्षाचे असू संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळी जशी मराठी माणसाची एकजूट झाली होती तशी एकजूट  करून सगळ्या मराठी माणसाने एकत्र आले पाहिजे.  महाराष्ट्र हा शूरांचा विरांचा आहे दगडांचा आहे पण यांच्यासारख्या धोंड्यांचा नाही.  एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही आणि दादागिरी केली तर आम्ही कोणाला सोडणार ही नाही असे ते म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या