Hot Posts

6/recent/ticker-posts

हे आहेत निरोगी राहण्याचे नियम...

 निरोगी राहण्याचे नियम...





नमस्कार या ब्लॉगमध्ये तुम्हाला आज मी काही आरोग्य विषयी माहिती सांगणार आहे ही अशी माहिती आहे की या गोष्टी फॉलो करून तुम्ही तुमच्या आयुष्य वाढवू शकता. 

 या आहेत काही हेल्थ टिप्स -  

1.जेवणामध्ये कायम हिमालय मीठ वापरा कारण याचे फायदे खूप आहेत यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो ,या मिठाचा वापर केल्यामुळे आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होत नाही.

2.नेहमी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट चालावे, कारण शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जेवल्यानंतर चालल्याने वजन कमी होण्यास मदत होते तसेच गॅस ऍसिडिटी यासारखे त्रास उद्भवत नाहीत तसेच झोप  लागण्यास पण मदत होते. 

3.संध्याकाळी जेवणानंतर कमीत कमी अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे जेवण झाल्यावर लगेच पाणी पिल्याने आपली पचनक्रिया मंदावते तसेच पोट फुलते. 

4.दिवसातून कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी प्यावे असे केल्याने आपले 90% आजार हे नाहीसे होतात. तसेच तुम्हाला किडनी स्टोन कधी होणार नाही. 

5.सकाळ सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कमीत कमी एक ग्लास पाणी प्यायला हवे आणि सकाळ सकाळी थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावे असे केल्याने डोळ्याची दिसण्याची क्षमता वाढू शकते. 

6.जेवणामध्ये जेवढे रंगबिरंगी पदार्थ बनवू शकतात तेवढे बनवावे जसे की फळे आणि पालेभाज्या यांचा वापर केल्याने आपल्याला खूप प्रमाणात विटामिन्स मिळतात. 

7. रात्रीच्या जेवणात कधीही दही राजमा आणि भाताचा समावेश नसावा कारण या गोष्टी तुमचे वजन वाढू शकतात  जर तुम्हाला या गोष्टी खायच्या असतील तर त्या दुपारच्या वेळेस खाणे योग्य आहे. 

8.उपाशीपोटी तुम्हाला कधीही चहा आणि कॉफी प्यायची नाहीये कारण उपाशीपोटी चहा आणि कॉफी पिल्यानंतर आपल्या पोटामध्ये खूप प्रमाणात ॲसिड निर्माण होते,आणि भुकेची तीव्रता कमी होते जर तुम्हाला चहा प्यायचा असेल  तर सकाळी काहीतरी नाश्ता करावा आणि चहाचे सेवन करावे. 

9.रात्रीचे जेवण  कधीही अधिक प्रमाणात करू नये तसेच रात्रीच्या जेवणात कधीच पिझ्झा, बर्गर यासारखे जंक फूड खाऊ नयेत. 

10. रोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे  कारण सफरचंद हे खूप प्रमाणामध्ये  शरीरासाठी महत्त्वाचे आहे. 

11.रोज कमीत कमी दहा हजार पावले चालावी असे केल्याने तुमचे हृदय देखील निरोगी राहते ,आणि पोटाची चरबी देखील कमी होण्यास मदत होते. सुरुवातीच्या काळात तुम्ही कमीत कमी पाच ते सात हजार पर्यंत पावले चालू शकता,असे करून तुम्ही हळूहळू दहा हजारापर्यंत पोहोचू शकता.

12. रोज एक ग्लास लिंबू पाणी प्यायला हवे लिंबू पाणी पिण्याचा फायदा असाआहे की लिंबू पाणी तुमच्या शरीरातील वजन कमी करण्यासाठी मदत करते आणि बॉडी डिटॉक्स देखील करते. तसेच लिंबू मध्ये असलेले विटामिन सी तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात. 

13.दुपारी जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही कमीत कमी एक  वाटी सलाड खाल्लं पाहिजे  हे खाल्ल्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत होते तसेच शक्ती मिळण्यास देखील मदत होते. आणि तुमची पचनक्रिया देखील चांगली होते. 

14.पाणी कधीही बसून आणि एक एक घोटच पिले पाहिजे  तसेच कधीही जास्त थंड पाणी पिऊ नये.

15. नियमित व्यायाम आणि विश्रांती खूप महत्त्वाचे आहे नियमित व्यायाम केल्याने शरीर निरोगी आणि स्वस्थ राहते. 

16. रोज आवडणाऱ्या गोष्टी केल्या तर मानसिक आणि शारीरिक सुख लागते  यामुळे मन आणि मेंदू शांत राहण्यास मदत होते. 

17.कमीत कमी सात ते आठ तास नियमित झोप घ्यावी कारण नियमित झोप घेतल्याने मन प्रसन्न राहते ऊर्जा प्राप्त होते. 

18.दररोज काहीतरी वाचणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे कारण रोज वाचल्याने बुद्धी वाढते आणि एकाग्रता क्षमता देखील वाढते. 

19.रोज मोकळ्या हवेत चालणे आणि सूर्यप्रकाश घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये विटामिन डी असते विटामिन डी हे हाडे मजबूत करण्यासाठी चांगले मानले जाते. 

20. दररोज मनोरंजन देखील महत्त्वाचे आहे आवडणाऱ्या गोष्टी रोजच्या रोज कराव्यात या गोष्टी केल्या नंतर तुम्हाला मानसिक सुख आणि शारीरिक सुख प्राप्त होईल. 

21.शाकाहारी भोजन करणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये मटकी,डाळी आणि कडधान्याचा समावेश करावा आणि जे शाकाहारी नाही त्यांनी अंडी फिश यासारख्या घटकांचा समावेश करावा. 

22. दिवसातून कमीत कमी चार वेळेस खाणे, एकदम खाल्ल्याने वजन वाढीची समस्या येऊ शकते. 

23.दररोज किमान दहा मिनिटे एकांतात बसा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. 

24.दररोज एखादा खेळ खेळा आणि आपल्यातलं बाल पण परत जगायला शिका. 

25. प्रत्येक ऋतू मधील वेगवेगळी फळे खावीत. 

26.म्हशीचे दूध तूप या गोष्टीचे सेवन टाळा त्याऐवजी गाईच्या तुपाचा आहारात समावेश करा. 

27. रोज सकाळी दोन तुळशीची पाने खावीत त्यामुळे तुम्हाला कधी सर्दी ताप मलेरिया होणार नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या