Hot Posts

6/recent/ticker-posts

सैयारा हा एक असा चित्रपट आहे जो....




Saiyara Movie Review :  सैयारा हा एक असा चित्रपट आहे जो कधी आधी बनलाच नाही या चित्रपटामध्ये एक अशी व्यक्ती जी की प्रेमामध्ये खूप तुटलेली आहे तर दुसरी एक अशी व्यक्ती जी की आपल्या स्वप्नांसाठी खूप झगडत असलेली आहे. त्या व्यक्तीचे स्वप्न एकच आहे की त्यात त्याला लोकांचे खूप प्रेम मिळावे ते ही त्याच्या गाण्यांमध्ये तर दुसरीकडे दुसरी व्यक्ती अशी व्यक्ती शोधत आहे जी त्याचा दुःखाचा भार सहन करून त्याला आपले करून घेईल. या चित्रपटांमध्ये या दोघांचे मन जुळायला लागते आणि या दोघांच्या जीवनाला एक नवीन वळण मिळते. मोहित सर यांनी दिग्दर्शित केलेल्या एक विलन, आशिकी २ या चित्रपटासारखे या चित्रपटात देखील एक विलन आहे आणि ती म्हणजे एक डायरी आहे. जी या चित्रपटामध्ये अभिनेत्रीच्या खूप जवळची आहे आणि ती त्या डायरीला खूप जपणारी आहे. 

अभिनेत्री त्या डायरीवर खूप काही लिहीत असते आणि त्याची पाने फाडत असते चित्रपट पाहताना असे वाटते की ती काहीतरी विसरली आहे किंवा तिला काहीतरी विचारायचं आहे. अभिनेता त्या डायरी मधले शब्द वाचून त्या डायरीच्या मालकिणीपर्यंत पोहोचून मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. चित्रपट मधला पहिला सीन ज्यामध्ये अभिनेत्रीला दाखविले जाते तो सिन इतक्या सुंदर तऱ्हेने दाखवण्यात आला आहे असा सीन बघून तुम्ही भावुक होण्यास भाग पडाल. तसेच अभिनेत्याचा सुरुवातीचा सिन  धमाकेदार दाखवला असून प्रेक्षकांना भुरळ पाडतो. काही वेळासाठी तुम्हाला वाटते की ॲक्शन सुरू होईल पण काहीच मिनिटात सुरुवात होते एका गाण्याची तेही अर्जित सिंग यांच्या आवाजामध्ये. जसे मोहित सुरी यांच्या चित्रपटांमध्ये गाण्याची छाप पाहायला मिळते तसेच या चित्रपटातील गाणे आणि त्या गाण्यांची भावना प्रेक्षकांना आवडून जाते. तसेच या चित्रपटामध्ये दोन जोडप्या मधील असलेले प्रेम त्यांची भावना आणि त्यांचे बोल आणि डायलॉग हे कुठेतरी बाकीच्या चित्रपटापेक्षा या चित्रपटाला वेगळे करते. इंटरवल च्या आधी झालेला भाग आणि इंटरवल नंतर सुरू झालेला भाग तुमचे पैसे वसूल करण्याचे काम करतो . चित्रपटामध्ये येणारा प्रत्येक सीन हा अंदाज लावण्या पलीकडचा आहे प्रत्येक सीन मध्ये काही ना काहीतरी वेगळेपणा लपलेला आहे. 

काही प्रेक्षक तर या चित्रपटाला आशिकी ३ हे नाव सोपवत आहेत. चित्रपटाचा शेवट हा खूप भावनिक आणि डोळ्यातून पाणी येईल असा बनवण्यात आला आहे. अभिनेता आणि अभिनेत्रीने या चित्रपटामध्ये अप्रतिम काम केलं आहे तर हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एका मोठ्या पडद्यावर पदार्पण करताना दिसत आहेत तरी त्यांच्या पहिल्या चित्रपटात त्यांची कामगिरी खूप कमालीची आहे. अभिनेता चा आणि अभिनेत्री चा हा चित्रपट पहिला आहे असं वाटत नाही. जसं आशिकी २ मध्ये श्रद्धा कपूर ने अगदी सरळ रित्या तिचा अभिनय पार पडला होता तसाच पूर्णपणे नैसर्गिक अभिनय अनित पड्डा या अभिनेत्रीने या चित्रपटांमध्ये पार पाडला आहे. या चित्रपटामध्ये संगीत देखील तितकेच महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक सीमागे येणारे संगीत आणि ठराविक वेळ नंतर येणारे गीत हे या चित्रपटाला एका नवीन स्तरावर पोहोचण्यास मदत करते. या चित्रपटांमधील भावनिक संगीत तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाते. हा चित्रपट सिनेमागृहामध्ये खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे या चित्रपटाचे सर्व शो जवळपास हाउसफुल झालेले आहेत बॉलिवूडमधील अनेक चित्रपटाला मागे टाकत या चित्रपटाने नवीन विक्रम रचले आहेत.


बॉक्स ऑफिस वरची कमाई

सैयारा हा चित्रपट मोहित सुरी दिग्दर्शित आहे या चित्रपटाचा सगळीकडेच बोलबाला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रात आणि इतर राज्यात देखील हा चित्रपट हाउसफुल झालेला दिसत आहे या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ही देखील चांगलाच उच्चांक गाठलेला दिसत आहे रोमँटिक लव्ह स्टोरी आणि भावनिक कथेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. सैयारा या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकारां  बद्दल बोलायचं झाले तर अनित पड्डा आणि  आहान पांडे हे नवीन कलाकार या चित्रपटांमध्ये काम करताना दिसून येतात. 60 करोड मध्ये बनलेला हा चित्रपट आपल्या खर्चापेक्षा सहा गुणा जास्तीने कमाई करताना दिसत आहे भारतामध्ये चालणारा हा चित्रपट विदेशात देखील चांगलाच कमाई करत आहे. या चित्रपटाने आपल्या पहिल्या दहा दिवसांमध्ये तब्बल 250 कोटी चा गल्ला जमा केला आहे तर या चित्रपटाने आपल्या अकराव्या दिवशी अकरा करोड रुपयांचा गल्ला जमवला तर या चित्रपटाने बाराव्या दिवशी 9 करोड रुपयांचा गल्ला जमवला आहे. 


प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया : 

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया विचाराच्या झाल्या तर त्या चित्रपटाबद्दल अनेक लोकांना आशा होती की हा चित्रपट पूर्वी आलेल्या आशिकी २, एक विलन या चित्रपटासारखी स्टोरी घेऊन येईल पण प्रेक्षकांना चित्रपट आल्यानंतर समजले की हा चित्रपट एक नवीन स्टोरी घेऊन नवीन कलाकारांसहित मोठ्या पडद्यावर झळकला आहे. वयोगट 18 ते 25 यामधील सर्व मुला मुलींना हा चित्रपट चांगलाच आवडला आहे तर काही लोकांना आणि प्रेक्षक वर्गांना हा चित्रपट अनेक चित्रपटांचे मिश्रण असल्याचं वाटत आहे. अशा या  चित्रपटाला दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या