Hot Posts

6/recent/ticker-posts

England Vs West Indies : बटलर आला धावून....

इंग्लंड साठी बटलर आला धावून....





 England Vs West Indies :  वेस्टइंडीज आणि इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे.  जॉस बटलर याचे शतक हुकले मात्र संघाला विजय मिळवून देण्यास तो यशस्वी झाला.  हा सामना चेस्टर स्ट्रीट मध्ये खेळला गेला ज्यामध्ये इंग्लंडने वेस्टइंडीज ला 21 धावानी हरवले. इंग्लंडने आपल्या टी ट्वेंटी ची सुरुवात खूप चांगल्या प्रकारे केली आहे.  या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर  इंग्लंडचा कर्णधार  हॅरी ब्रूक याने फलंदाजी  घेतली होती. 

   

हॅरी ब्रूक याचा फलंदाजी करण्याचा निर्णय तसा योग्य आहे असं वाटत नव्हता कारण  दुसऱ्या ओव्हर मध्येच त्यांची एक विकेट गेली होती परंतु दुसरी विकेट पडण्याआधी इंग्लंडची स्थिती खूप चांगली झाली होती इंग्लंडचा जॉस बटलर याने 59 चेंडूमध्ये सहा षटकार आणि चार चौकार मारत 96 रनापर्यंत झेप घेतली तर वीस चेंडू मध्ये 38 रन स्मित यांनी बनवले वेस्टइंडीज चा रोमॅरिओ शेफर्ड याने चार विकेट मिळवल्या. अशा तऱ्हेने इंग्लंडने 20 ओव्हर मध्ये सहा विकेट गमावून 188 रन बनवले. 

 

तर वेस्टइंडीज टीम 189 रणाचा पाठलाग करत असताना खूप चांगली कामगिरी करू शकली नाही. 20 ओव्हर मध्ये वेस्ट इंडीज टीम 9 विकेट गमवून 167 रन बनवू शकले  लियाम डोसन यांनी चार गडी बाद केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या