Housefull 5 Review : पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेला हाउसफुल चित्रपट नुकताच पाचव्या पार्ट पर्यंत येऊन पोहोचला आहे. कलाकारांनी हाउसफुल असलेला हा चित्रपट सध्या सोशल मीडिया आणि थेटर मध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला असून, हाउसफुल या चित्रपटाने पहिल्या चार भागांना धरून साधारण 788 करोड रुपये कमावले होते आता हा चित्रपट काय नवीन रेकॉर्ड करतोय हे बघितले जात आहे तब्बल 19 दिग्गज कलाकारांना मिळून हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे. या चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त लक्ष अक्षय कुमारने वेधलं आहे. त्याचा दोन वर्षांपूर्वी आलेला सिनेमा OMG 2 हा हिट झाला होता नंतर त्याचे सलग चार चित्रपट फ्लॉप झाले होते.
चित्रपटाची स्टोरी -
चित्रपटाची स्टोरी ही खूप गुंतागुंतीची असलेली दिसून येते. सुरुवातीला होणारा मृत्यू तसेच हत्या आणि या सगळ्यांमध्ये कॉमेडी अशा पद्धतीने या चित्रपटाची स्टोरी किलर कॉमेडी म्हणून संबोधण्यात येत आहे. स्टोरी वरून साफ दिसून येत आहे की कॉमेडी करण्यास कलाकारांना सांगितलं जात आहे पण स्टोरी लिखाणामध्ये अजिबात कॉमेडी दिसून येत नाही. चित्रपटामध्ये फक्त अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांचे फनी रिएक्शन आणि एक्स्प्रेशन फक्त कॉमेडी वाटत आहेत. संजय दत्त, नाना पाटेकर जॉनी लिव्हर यासारख्या दिग्गज कलाकारांना वेस्ट केल्याचे दिसून येत आहे. कुठे कुठे स्टोरी अपूर्ण दिसून येत आहे तर त्या स्टोरीला पूर्ण करण्यासाठी गाण्याचा वापर केला गेला आहे.
कलाकारांची एक्टिंग -
अभिनयाच्या मामल्यात कोणताही अभिनेता अभिनय करताना दिसून येत नाही. अभिनयाच्या नावाखाली चित्रपटात ओवर एक्टिंग केल्याचे दिसून येत आहे फक्त नाना पाटेकर यांचा अभिनय चित्रपटात खराखुरा वाटत आहे.
रेटिंग - 1.5
0 टिप्पण्या