शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरेंचा शहा आणि मोदी वर चांगलाच निशाणा..
राज ठाकरे : भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरे म्हणाले की माझी तब्येत बरी नाही तरीदेखील मी जयंतराव यांच्या प्रेमाखाते आणि तुमच्या प्रेमाखातर इथे आलो आहे. पावसाळा कमी झाल्यानंतर मी पनवेल मध्ये सभा घेईल असे त्यांनी म्हटले त्यांनी असे म्हटले की आताचे आजार आणि आपल्या महाराष्ट्राचे आजचे राजकारण हे काय वेगळे नाही आजारांसारखेच आपली माणसं या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात सतत फिरत आहेत. स्वतंत्र मिळण्याच्या अगोदर जवळपास 12 ते 13 दिवस आधी ज्या पक्षाची स्थापना झाली तो म्हणजे शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र मधल्या स्वतंत्र पूर्व तयार झालेल्या पक्षांपैकी हा एकच पक्ष आहे.
इतक्या वर्षापासून हे सगळं टिकून आहे याच मला खूप आश्चर्य आहे असे ते म्हणाले. 1981 साली शिवसेनेचे पहिलं अधिवेशन हे मुंबईत झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद डांगे आले होते असे ते म्हणाले राजकारण आणि राजकारणी हे उदार आहेत आणि होते . जयंतराव म्हणाले म्हणून मी काही जास्त बोलत नाही असे ते म्हणाले ते म्हणाले की शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर मी पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा आलो आहे. पाच वर्षांपूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी जयंतरावाच्या प्रचाराला देखील आलो होतो असे ते म्हणाले राजकीय पक्ष असतात निवडणूक असतात निवडणूक होतात निवडणुका लढवल्या जातात पण प्रमुख जो महाराष्ट्रा मधला मुद्दा आहे तो खास करून जो रायगड जिल्ह्याचा आहे तो मुद्दा मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेण्यासारखा आहे तेही पक्षाचा विचार न करता असं ते म्हणाले.
जेव्हा जेव्हा नवीन रस्ते आलेले आहेत आणि त्यावेळेस राज्यकर्त्यांचे जर लक्ष नसेल तर तो प्रदेश बरबाद व्हायला वेळ लागत नाही असे देखील ते म्हटले. ते असे म्हणाले की महाराष्ट्रातील मुख्यमंत्री महाराष्ट्रातील मुलांसाठी हिंदी विषय कसा आणता येईल आणि हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करत आहे ते म्हणाले की पण महाराष्ट्र मध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा तो विचार करत नाहीयेत . महाराष्ट्रा मधल्या मराठी माणसाचा महाराष्ट्रा मधल्या भूमिपुत्राचा याचा विचार हे सरकार करत नाही असेही ते म्हणाले. येथे सगळ्यात मोठे उदाहरण आणि भीषण उदाहरण जे असेल ते म्हणजे रायगड जिल्हा आहे आज या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत कुठे चालल्या आहेत काय माहित नाही हे वार करणारे आपलेच आहेत असे ते म्हणाले. ते म्हणाले की महाराष्ट्रा मधले तयार होत असलेले उद्योगधंदे आणि त्यात काम करायला हे बाहेरच्या राज्यातून येत आहेत हे योग्य नाही.
शेतकरी कामगार पक्षाच्या आज मी व्यासपीठावर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात जे बाहेरचे उद्योगधंदे टाकत आहेत याला काय अर्थ नाही आपल्या मराठी माणसाला तिथे जागा भेटत नाही याचा विचार हे सरकार करत नाही असे ते म्हणाले. या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजे असे ते जयंतरावांना म्हणाले. तो शेतकरी आहे तो बरबाद होणार नाही आणि जे मुलं मुली आहेत त्यांना या उद्योगधंद्या मध्ये काम करायला मिळाले पाहिजे याचा विचार आपण सर्व पक्षांनी केला पाहिजे . भाषा बद्दल बोलायचं झालं तर ते असे म्हणाले की अमित शहा चे मी एक वाक्य ऐकले होते ते एका मुलाखतीदरम्यान असे म्हणाले की मी स्वतः एक हिंदी भाषिक नाही , मी गुजराती आहे. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं मग आपण मराठी बद्दल प्रेम का बाळगू नये. ते असे म्हणाले की मी मागे एकदा बोललो होतो की जर तुमची भाषा संपली आणि तुमची जमीन संपली तर जगाच्या कुठल्याही पाटीवर तुम्हाला स्थान नाही. ते म्हणाले की उद्या जर तुम्ही महाराष्ट्र मधून गुजरात मध्ये शेतजमीन विकत घेण्यास गेलात तर ते तुम्हाला मिळणार नाही आणि हे सगळं आपल्या देशातच चालू आहे .
आज आमच्या रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कोण येत आहे कोण राहत आहे कोण जमिनी घेत आहे काही माहिती नाही असे ते म्हणाले. ते म्हणाले की या जमिनी आपलीच लोक विकत आहेत आणि आपल्या माणसाला हे कळत नाही की या जमिनी विकून आपणच संपून जाणार आहोत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे याच्यापुढे उद्योगधंद्यासाठी आणि जमिनीसाठी जर तुमच्यापुढे लोक आले तर त्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत त्याला म्हणायचे की आम्ही जेवढे शेतकरी आहोत तेवढे आम्ही तुमच्या कंपनीत पार्टनर म्हणून येणार आमची मुलं तर लागतीलच तुमच्या कंपनीत कामाला पण आम्ही फुकट आमच्या जमिनी तुम्हाला देणार नाही असा त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला संदेश दिला.
आज या गोष्टी आपण वापरल्या नाहीत तर आपल्या हाती काही राहणार नाही उद्या याच ठिकाणी या रायगड मध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील, अमराठी आमदार निवडून येतील ,अमराठी खासदार निवडून येतील , याचा कुठेतरी विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. बाहेरून कुठून तरी एक उद्योगपती येणार तुमच्याकडून जमिनी घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान घालणार असे मी होऊ देणार नाही ते असेही म्हणाले . या महाराष्ट्रात जर तुम्हाला उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला हे उद्योगधंदे चालू करावे लागतील असे ते म्हणाले. जे काही रस्ते होणार ते सगळे फक्त मंत्र्यांनाच माहिती आहे सामान्य माणसाला काहीच माहिती नाही आणि आपले सरकारच या माणसांना जमिनी देत आहे आणि वाटेल ते करत आहे असे ते म्हटले. सर्वाधिक डान्सबार हे देखील रायगड जिल्ह्यामध्ये आणि तेही कोणाचे तेही अमराठी लोकांचे या महाराष्ट्रात मराठी माणसाची नुसती पिळवणूक चालू आहे असे विधान त्यांनी केले.
0 टिप्पण्या