Hot Posts

6/recent/ticker-posts

ही आहे महिंद्राची BE 6 ....

 

    ही आहे महिंद्राची BE 6 ....


 Mahendra BE 6 Review : ही आहे महिंद्राची BE 6 आज आपण या गाडीच्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी जाणून घेणार आहोत ही गाडी महिंद्रा ने नवीन लाँच केली असून ही गाडी महिंद्राच्या बाकीच्या गाड्यांसारखी नाही कारण या गाडीमध्ये खूप सारे नवीन फीचर्स तसेच गाडीचा आकार आणि केलेलं मॉडिफिकेशन खूप वेगळ आहे. महिंद्रा या कंपनीने पहिल्यांदाच अशा प्रकारची गाडी लॉन्च केली आहे ही गाडी फक्त दिसायला सुंदर नसून गतीला सुद्धा स्मार्ट आहे. गाड्यांमध्ये खूप काही नवीन नवीन फीचर्स येत असतात जसं की ऑटो पार्किंग , एडास आणि कॅमेरे . महिंद्राच्या BE 6 मध्ये देखील यासारखे फीचर अनुभवायला मिळतील महिंद्रा BE 6 या गाडीची स्टाईल खूपच वेगळी आहे जी तुम्हाला बघण्यास भाग पडेल यामध्ये ऑरेंज कलर आणि व्हाईट कलर देखील आहेत .

यामध्ये गाडीच्या चाकांचे बोलायचं झाले तर 19 इंचाचे टायर यामध्ये लावले गेलेले आहेत आणि ग्राउंड क्लिअरन्स देखील खूप छान आहे या गाडीमध्ये बेस्ट मॉडेल पासूनच चार Disc Breaks अवेलेबल आहेत महिंद्रा BE 6या गाडीमध्ये गाडीच्या आरशा जवळ देखील दोन कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि गाडीची समोरील बाजू जितकी वेगळी आहे तितकीच मागील बाजू देखील खूप वेगळी बनवलेली आहे.

 एक गाडीमध्ये कमीत कमी सहा पार्किंग सेन्सर्स आहेत तर बाकीच्या गाडीशी कम्पेअर करायचं झाले तर बाकी कंपनीच्या गाड्या या फक्त दोन सेंसर देत आहेत यावेळी गाडीची डिग्गी देखील खूप मोठी आणि प्रशस्त बनवले आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे कोणतेही सामान ठेवू शकता या गाडीला बनवताना लागणारे सामान देखील खूप उच्च प्रतीचे वापरण्यात आलेले आहे. या गाडीचे आतील बाजू बघायची झाली तर या गाडीचे इंटिरियर देखील खूप आकर्षित बनवले गेले आहे या गाडीच्या इंटिरियर मध्ये तीन रंगांचा वापर केलेला आहे त्यामध्ये ब्लॅक, ग्रीन आणि ग्रे हे कलर वापरले गेले आहे आणि आतील बाजूची डिझाईन देखील खूप स्टायलिश बनवली आहे. या गाडीची टच स्क्रीन जी आहे ती खूप चांगली बनवण्यात आली आहे . ही भारताची पहिली अशी गाडी आहे जी  5G हार्डवेअर ला सपोर्ट करत आहे . गाडीच्या बाहेर येऊन देखील तुम्ही गाडी पार्क करू शकता तेही फक्त चावीच्या मदतीने. या गाडीच्या सनरूप मध्ये लाइटिंग देखील दिलेली आहे या गाडीमध्ये वायरलेस चार्जर दोन दिलेले आहेत गाडीमध्ये टोटल सोहळा स्पीकर्स दिलेले आहेत जे की डॉल्बी साउंड करतात . या गाडीत सुरक्षेसाठी सात एअरबॅक्स दिलेले आहेत तसेच 360 कॅमेरा देखील आहे या गाडीमध्ये तुम्ही पाठीमागच्या सीटवर तिघेजण आरामशीर बसू शकता. तसेच BE 6 या गाडीचा फ्लोअर देखील खूप फ्लॅट आहे त्यामुळे बसण्यास आराम लाभतो. तसेच या गाडीला LED हेडलाईट दिलेली आहे आणि ही गाडी फुल ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे. या गाडीच्या समोरच्या सीटच्या पाठीमागे दोन चार्जिंग पॉइंट दिलेले आहेत. 

गाडीची सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याची राईड खूप अविश्वसनीय आहे. गाडीची स्टेरिंग आणि स्पीड देखील खूप चांगला आहे गाडी चालवताना एक वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो ही गाडी सिटीमध्ये चालवण्यासाठी योग्य आहे. या गाडीमधील समोरचा कॅमेरा 1.8 मेगापिक्सल इतका आहे.  गाडीमध्ये एक वॉर्निंग सिस्टीम देण्यात आलेली आहे ज्यामध्ये जर चालक हा रोड सोडून दुसरीकडे बघत असेल तर या गाडीच्या स्क्रीन वरती एक Distracted नावाचं वॉर्निंग येतं हे सेफ ड्रायव्हिंग साठी खूप महत्त्वाच आहे. या गाडीचे स्टेरिंग देखील तितकेच स्मूथ आहे. ही गाडी एक इलेक्ट्रिक असून एकदा चार्जिंग केल्यानंतर ही गाडी तब्बल 400 ते 500 किलोमीटर पर्यंत आरामशीर जाऊ शकते. 



 का घ्यावी महिंद्रा BE 6 :

महिंद्रा BE 6 ही गाडी महिंद्रा कडून खूप वेळानंतर आलेली गाडी आहे जी गाडी लॉन्च झाल्यानंतर खूप प्रमाणात लोकांनी घेतली आहे. या गाडीचा असणारा लूक , सेफ्टी आणि पळण्याची क्षमता त्यामुळे या गाडीची मागणी वाढत असून ही गाडी भारतात अनेक ठिकाणी घेतली जात आहे या गाडीमुळे तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल जर तुमचं बजेट हे 25 ते 30 लाखापर्यंत असेल तर ही गाडी तुम्हाला एक वेगळीच मजा देईल. महिंद्रा कंपनीने यावेळेस ही गाडी मॉडिफाइड केली असून या गाडीला एक स्पोर्ट्सचा लुक आणि फीचर्स देण्यात आलेले आहेत ही गाडी सिटी मध्ये तसेच हायवे वर चालवण्यास काही हरकत नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या