Hot Posts

6/recent/ticker-posts

iPhone 17 बदलू शकतो मोबाईलचं मार्केट....

 iPhone 17 बदलू शकतो मोबाईलचं मार्केट....





  Iphone 17 Review :  iPhone 17 बदलू शकतो मोबाईलचं मार्केट आपण या ब्लॉगमध्ये येणाऱ्या काळात दिसणारा iPhone 17 प्रो आणि iPhone 17 प्रोमॅक्स याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. या ब्लॉगमध्ये तुम्हाला आयफोन 17 बद्दल खूप काही माहिती तसेच नवीन आलेले फीचर्स कळणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर iPhone 17 लाँच होण्यासाठी जास्त वेळ राहिला नाही कारण हा फोन येणाऱ्या सप्टेंबर मध्ये लवकरच लॉन्च केला जाईल सोशल मीडियावर सांगितलं जात आहे की हा फोन 9 सप्टेंबर रोजी लॉन्च होऊ शकतो. या iPhone 17 मध्ये यावेळेस ॲपल कंपनीने iPhone चे नवीन कलर लॉन्च करण्याचे ठरविले आहे यामध्ये या फोनला निळा रंग देण्यात आलेला आहे तर दुसऱ्या मध्ये केसरी रंगाचा शेड देण्यात आलेला आहे.

डिझाईन - 

डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर या फोनचा डिस्प्ले 6.3 इंचाचा असेल हा डिस्प्ले iPhone 17 प्रो मध्ये बघायला मिळेल तर iPhone 17 प्रो मॅक्स मध्ये आपल्याला हा डिस्प्ले 6.9 इंचाचा दिसेल या नवीन iPhone मध्ये टायटॅनियम चा सोडून ॲल्युमिनियमचा फ्रेम पाहायला मिळणार आहे. या नवीन फोन मध्ये फोनची जाडी थोडी कमी करण्यात आली आहे म्हणजेच फोन हा आधीच्या iPhone पेक्षा अधिक स्लिम असणार आहे. या फोनच्या डिझाईन मध्ये ॲपल कंपनीचा लोगो हा थोडा खालच्या बाजूने देण्यात आलेला आहे तर पूर्वीच्या iPhone मध्ये हा लोगो बरोबर मध्यभागी दिला होता. डिस्प्ले मध्ये एक, अँटी रिफ्लेक्टिव्ह स्क्रीन पाहायला मिळणार आहे. iPhone 17 चे कलर्स हा यावेळेस बदललेले दिसणार आहेत. iPhone 17 हा पाच वेगवेगळ्या कलर मध्ये बघायला मिळणार आहे ते कलर म्हणजे पांढरा ,काळा ,ग्रे, निळा आणि केशरी असे असणार आहेत..

परफॉर्मन्स - 

या फोनच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर iPhone हे नाव खूप दिवसापासून चालत आलेले आहे ते म्हणजे त्यांच्यामधील असलेले फीचर्स, कॅमेरा आणि इतर गोष्टी साठी आयफोन खूप प्रसिद्ध आहे. iPhone 17 च्या येणाऱ्या प्रो मॉडेल मध्ये a19 प्रो चीप असणार आहे. तर 12 जीबी रॅम देखील असणार आहे. असा अंदाज लावला जात आहे की iPhone 17 चे स्टोरेज कमीत कमी दोन TB पर्यंत जाऊ शकते. 


कॅमेरा - 

 सगळ्यात मोठं अपडेशन हे या फोनमध्ये कॅमेरात दिसून येणार आहे या फोनला देखील पूर्वीच्या iPhone सारखे तीन कॅमेरा असणार आहेत एक फ्लॅश असणार आहे. हे तिन्ही कॅमेरे 48 मेगापिक्सल चे असणार आहेत यामध्ये असं बोलल जात आहे की यावेळेस या फोनमध्ये 8 K रेकॉर्डिंग सुद्धा करता येणार आहे . त्यामुळे व्हिडिओची कॉलिटी देखील चांगली येईल तसेच या फोनमध्ये समोरील आणि पाठीमागचा कॅमेरा दोन्ही एकाच वेळेस चालू करता येणार आहे . या कॅमेरा मुळे खूप चांगले व्हिडिओ शूट करू शकणार आहात आणि 8K रेकॉर्डिंग असल्यामुळे पिक्चर कॉलिटी देखील खूप चांगली भेटणार आहे. 


बॅटरी बॅकअप - 

यावेळेस iPhone 17 मधील बॅटरी ची कॅपॅसिटी देखील वाढणार आहे जर आपण iPhone सतरा प्रोमॅक्स बद्दल बोलायचं झाले तर याची बॅटरी 5000 पर्यंत जाऊ शकते सहसा iPhone ची बॅटरी हे अँड्रॉइड फोन पेक्षा कमीच बघायला मिळाली आहे पण यावेळेस ॲपल कंपनी आयफोनची बॅटरीची क्षमता वाढवून नक्कीच येईल असं वाटत आहे. या सगळ्या फिचर बद्दल बोलायचं झालं तर नवीन कलर्स, नवीन डिझाईन, नवीन कॅमेरा ,फीचर्स ,फोनची कार्यक्षमता, हे सगळं बघितलं तर हा येणारा iPhone 17 नक्कीच मोबाईलच्या मार्केटमध्ये वरती जाताना दिसून येईल.

या फोनची किंमत पाहायला गेली तर किमतीच्या बाबतीत iPhone  हा नेहमीच महाग पाहायला मिळतो भारतामध्ये मागील काही काळात आयफोन ची किंमत तशी कमी करण्यात आली होती पण यावेळेस किंमत ही सेम असू शकते किंवा नवीन फीचर्स असल्यामुळे या फोनची किंमत वाढू शकते. 

या फोनच्या लॉन्चिंग बद्दल बोलायचं झालं तर नेहमीप्रमाणे हा फोन सप्टेंबर मध्येच लॉन्च होण्याची शक्यता आहे कारण कारण यापूर्वी आलेला  iPhone 16 हा देखील 9 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आला होता , iPhone 15 हा 12 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात आला होता ,iPhone 14 हा 7 सप्टेंबर 2022 ला लॉन्च करण्यात आला होता आणि iPhone 13 ,14 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात आला होता. 

तसेच ॲपल च्या घड्याळाबद्दल सांगायचं झालं तर ॲपल वॉच सिरीज 11 हे देखील लवकरच येणार आहे तसेच ॲपल वॉच SE3 देखील लवकरच लॉन्च होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या