Hot Posts

6/recent/ticker-posts

Upcoming Maruti Suzuki Cars ..

 जाणून घ्या मारुती सुझुकीच्या या नवीन गाड्या..




  Maruti Suzuki : जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर आज मार्केटमध्ये खूप सार्‍या पद्धतीच्या गाड्या बघायला मिळत आहेत आणि काही काही जण तर अशा अफवा  पसरवत आहेत की ही गाडी येणार आहे नवीन फीचर्स सहित, या दिवशी येणार आहे पण यासारख्या अफवांवर विश्वास नाही ठेवलेलाच बरा. आज आपण मारुती या कंपनीच्या विविध गाड्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. मारुती सुझुकी येणाऱ्या काही तीन ते चार वर्षांमध्ये ज्या गाड्या लाँच करणार आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात . म्हणजे तुम्हाला समजेल की आपण त्या गाडीसाठी थोडा वेळ थांबले पाहिजे की नाही , तसेच आम्ही या ब्लॉगमध्ये हेही सांगणार आहोत की या नवीन गाड्या कोणत्या दिवशी येणार आहे. तर पहिली गाडी अशी आहे  लोकांना घ्यायला खूप स्वस्त पडेल. तर पहिली आहे ब्रेजा आणि नंतर येते ती विटारा , ब्रेझा ही एरीना कडून विकली जाते तर नेक्सा कडून विटारा ही गाडी विकते, जे की ब्रेजापेक्षा महाग पाहायला मिळते. 

तसे बघायला गेले तर विटारा ही गाडी पूर्ण देशभर चांगली पसरली नसून ती लोकांपर्यंत जास्त पोहोचली नाही. तसेच मारुती एक नवीन विटारा एसयूव्ही घेऊन येईल , ज्याची किंमत बारा ते वीस लाखा मध्ये असेल. ही असेल फाईव्ह सीटर एसयुव्ही जे की ब्रेझा या गाडी पेक्षा थोडी मोठी असेल , पण याची डिझाईन ब्रेजा सारखी असेल या गाडीमधील इंटरनल सिस्टीम ब्रेजा सारखे पाहायला मिळेल ज्यामध्ये सन रूप ,थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा ,नऊ ते दहा इंच पर्यंत स्क्रीन , आणि चांगल्या कॉलिटी चे स्पीकर्स पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये 1.5 लिटरचा सीएनजी असणार आहे तसेच पेट्रोल देखील असणार आहे तर या सगळ्या गोष्टी मारुती सुझुकी एका नवीन गाडीमध्ये घेऊन येणार आहे तर त्या गाडीचं नाव आहे ESCUDO. तर ही गाडी अंदाजे सप्टेंबर ,ऑक्टोबर मध्ये लॉन्च होऊ शकते. तर आता बघुयात दुसरी गाडी ,मारुती कंपनी येणाऱ्या काळात अशी गाडी घेऊन येणार आहे जी आजपर्यंत कधीच त्यांनी लॉन्च केली नाही. मारुती ही कंपनी येणाऱ्या काळात एक इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करणार आहे जिचे नाव आहे इ- विटारा . नावावरून असं वाटेल की ही गाडी ग्रँड विटारा सारखी असेल पण ती फक्त नावामुळे सेम वाटेल बाकी सगळं बदललेल असेल. या दोन्ही गाडीमध्ये गाडीची डिझाईन ,गाडीचा शेप आणि दोन्ही गाड्यांची प्राईज देखील वेगळी वेगळी असेल. साधारणपणे ही इलेक्ट्रिक गाडी 18 ते 24 लाख पर्यंत मिळू शकते. तर एका चार्ज मध्ये ही गाडी चारशे ते साडेचारशे किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. या गाडीमध्ये देखील सनरूप असेल व्हेंटिलेटर सीट्स असतील तसेच 360 डिग्री कॅमेरा असेल, अशा या दोन गाड्या येणाऱ्या 2025 मध्ये लॉन्च होणार आहेत. 

2026 मध्ये येणाऱ्या गाड्या  : 

येणाऱ्या 2026 मध्ये मारुती कंपनी खूप नवीन गाड्या लॉन्च करणार आहे . त्याच्यामध्ये पहिली गाडी आहे "बलेनो" याच्यामध्ये बद्दल असा केला गेला आहे की यापूर्वी फोर सिलेंडर सिस्टीम देण्यात आली होती तर नवीन येणाऱ्या गाडीमध्ये तीन सिलेंडर सिस्टीमच असणार आहे मारुती कंपनीचे लक्ष हे गाडीच्या मायलेज वरती असणार आहे . या गाडीच्या इंटेरियर मध्ये जास्त काही चेंज होणार नसून फक्त स्टाईल चेंज होईल पूर्वीच्या बलिनो सारखे सर्व फिचर या गाडीमध्ये असणार आहेत आणि काही फीचर्स हे नवीन असणार आहे . या गाडीमध्ये देखील 360 डिग्री कॅमेरा ,अँड्रॉइड एप्पल कार प्ले ,सहा एअरबॅक्स, हे सगळे फिचर असणार आहेत तर किंमती बद्दल बोलायचं झालं तर येणाऱ्या या बलेनो कार मध्ये किंमत वाढ दिसून येईल .  तर दुसरी गाडी आहे FRONX जर बलेनो गाडीत बदल झालेले असतील तर या गाडीत देखील काही बदल पाहायला मिळतील या गाडीच्या इंजिन मध्ये बदल करण्याची शक्यता वाटत आहे या गाडीची किंमत देखील एक-दीड लाखाने वाढू शकते. तर दुसरी गाडी ही अशी आहे ज्यामध्ये खूप काही बदल होऊ शकतात ती म्हणजे "मारुती ब्रेजा". येणाऱ्या मारुती ब्रेजा मध्ये खूप बदल पाहायला मिळतील ज्यामध्ये गाडीचा शेप आणि लुक वेगळा पाहायला मिळेल,

 या गाडीमध्ये एक्स्टर्नल फीचर्स आणि इंटरनल फीचर्स देखील बदलले जातील तसेच गाडीची डिझाईन देखील वेगळी पाहायला मिळेल. या येणाऱ्या ब्रेजा गाडीमध्ये इंजिन देखील बदलले जाऊ शकते . बदलल्या गेलेल्या इंजिनमुळे तुम्हाला गाडी चालवताना एक वेगळा अनुभव पाहायला मिळेल आणि गाडीचा परफॉर्मन्स वाढलेला दिसून येईल . या गाडीची किंमत साधारण 9 ते 17 लाख पर्यंत होती तर येणाऱ्या गाडीमध्ये देखील ही प्राईस तशी सेम पाहायला मिळू शकते. मारुती या कंपनीशी टक्कर देणारी कंपनी म्हणजे टाटा आणि त्यांची गाडी म्हणजे " पंच "या गाडीने मारुती या कंपनीचा भारतामध्ये विकणाऱ्या गाडीच्या तक्त्यामधील पहिला क्रमांक घालवला होता आणि टाटा पंच या गाडीने पहिला क्रमांक पटकावला होता या काडीला टक्कर देणारी गाडी नक्कीच मारुती लवकर लॉन्च करेल. ही येणारी गाडी आठ ते दहा लाख का पर्यंत मिळू शकेल टाटा पंच देणारे सर्व फीचर्स या गाडीमध्ये मारुती लॉन्च करेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या